Pune Crime news  Saam tv
मुंबई/पुणे

कुटुंब अंत्यविधीसाठी गेलं; चोरटे दरवाजा तोडून घरात घुसले, मारला वॉशिंग मशीनमधील दागिने आणि पैशांवर डल्ला

Pune Crime news : घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Akshay Badve

कुटुंब अंत्यविधीसाठी गावाला गेल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा .

चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडला अन् घरात केला प्रवेश

वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

पुणे : पुण्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. पुण्यात एका घरातून वॉशिंग मशीनमध्ये ठेवलेले ९९ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केला. पुण्यातील कात्रज भागात ही घटना उघडकीस आली आहे. ३० वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज भागात असलेल्या सच्चाई माता मंदिर परिसरात २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान घडला. तक्रारदार हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या साडूच्या भावाच्या अंत्यविधीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे गेले होते. यावेळी घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा हत्याराच्या साह्याने तोडला. त्यानंतर चोरून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरात अनेक ठिकाणी हाती काही लागत आहे का, यासाठी शोध घेतला. तेव्हा त्यांची नजर घरामध्ये असलेल्या वॉशिंग मशीनकडे गेली.तेव्हा त्यांनी वॉशिंग मशीन उघडली. त्यात एक डब्बा ठेवल्याचं दिसून आलं.या डब्ब्यात सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम फिर्यादी यांनी ठेवली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डब्यामध्ये साधारण ९९ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. चोरट्यांनी तो दागिन्यांचा डबा घेऊन तिथून पसार झाले. आंबेगाव पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Session: भारतातील मोठ्या विमानतळावर सायबर अटॅक; विमानांचा डेटा लीक करण्याचा प्रयत्न

इन्फ्लूएन्सरचा '१९ मिनिटांचा' MMS व्हिडिओ लीक; तरूणीनं आणखी एक VIDEO केला शेअर, म्हणाली २ तरूणांनी..

Prajakta Gaikwad: मुहुर्त वेळा आली...; प्राजक्ताच्या हाती सजला हिरवा चुडा, थाटामाटात होणार उद्या लग्न!

Creamy Spinach Pasta: नाश्त्याला उपमा, पोहे खाऊन कंटाळलात? झटपट बनवा क्रिमी पालक पास्ता, वाचा सोपी रेसिपी

'मला धोका दिला'; हॉस्टेलमध्ये केली बायकोची हत्या, नंतर नवऱ्याचे WhatsApp स्टेट्स पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT