Pune Accident deaths News In Marathi
Pune Accident deaths News In Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

Prachee kulkarni

Pune Accident Black Spots News:

पुणे शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात अपघातांमध्ये ११३ टक्क्यांनी वाढ झाली असून राज्य सरकारकडून अपघाताचे ६३ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.

या ठिकाणी होतात सर्वात जास्त अपघात...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपघातांचे ६३ ब्लॅक स्पॉट राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत. या ब्लॅक स्पॉटमध्ये नवले पूल, सातारा रोडवरील कात्रज चौक, खडीमशीन चौक, त्यासह मुंबई बेंगळूर महामार्गावरील वाकड, बावधन, तसेच पिंपरी चिंचवड परिसराचा समावेश आहे.

या भागांमध्ये अपघाताचे सर्वात जास्त प्रमाण असल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात २०२० पासून अपघातांच्या संख्येत ११३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकीने प्रवास करणारे आणि पादचारी चालणाऱ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरिक्षणही नोंदवण्यात आले आहे.

या ठिकाणी होतात सर्वात कमी अपघात....

पुणे शहर (Pune) परिसरातील विमानतळ, कोंढवा, येरवडा, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड शिवाजीनगर (Shivajinagar) परिसर या भागात सर्वाधिक कमी अपघात होतात, असेही निरिक्षण नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, वाढत्या अपघातांवर राज्य सरकार आणि पीएमआरडीए उपाययोजना करणार आहेत. तसेच अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने दिले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shiv Sena UBT: खोटेपणा साप, बाळासाहेबांचा शाप..! Sanjay Raut नरेंद्र मोदींबाबत काय बोलून गेले?

Today's Marathi News Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दादर शिवाजी पार्कवर पोहोचणार

Pandharpur Vitthal Rukmini Temple News: पांडुरंगाच्या भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी!

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT