Pune Ring Road Project Saam tv
मुंबई/पुणे

Pune Ring Road Project: पुण्यातील वाहतूककोंडी संपणार, ४२,७११ कोटींचा प्रोजेक्ट, रिंग रोड प्रकल्पाची A टू Z माहिती

Pune Highway: रिंग रोड प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प पुणे-बंगळुरू, पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई यांसारख्या महामार्गांना जोडला जाणार आहे.

Saam Tv

Pune Ring Road Project: पुण्यात वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये सुरु करण्यात आला. या प्रकल्पाचा प्रस्तान १९९८ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आला होता. पुढे २०१६ मध्ये प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर झाला. दरम्यान भूसंपादनला विलंब होत असल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे.

महाराष्ट्र सरकारने पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी अतिरिक्त २०,३७५.२१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या एकूण खर्चाची रक्कम ४२,७११.०३ कोटी रुपयांवर गेली आहे. बांधकाम सुरु व्हायचे असूनही प्रकल्पाचे बजेट वाढवण्यात आले. खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर लगेच तीन वर्षांनी प्रकल्पाचा खर्च वाढला. याबाबतचे स्पष्टीकरण एमएसआरडीसीने दिले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, केसनंद गावाजवळ कामाचा शुभारंभ करण्यात आला. कंत्राटदाराने कार्यालयाचे आणि यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. शिवाय वाडेबोल्हाई गावामध्ये पारंपरिक प्रार्थना सभारंभ आयोजित केला गेला. यातून प्रकल्पाला सुरुवात झाल्याचे संकेत मिळाला आहे. बांधकाम जलद गतीने करण्याच्या दृ्ष्टीने १०० हून अधिक उत्खनन यंत्रे आणि उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

पुणे रिंग रोड प्रकल्पाती सविस्तर माहिती

पुण्यातील ८३ गावांना जोडणारा पुणे रिंग रोड प्रकल्प साधारणपणे १७० किमी लांब असणार आहे. हा प्रकल्प पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, पुणे-बंगळुरू, पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई यांसारख्या प्रमुख महामार्गांना जोडला जाईल असे म्हटले जात आहे.

पूर्व विभाग

१. मार्ग - उर्से (मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग) ते सोलू (आळंदी-मार्कल रोड) ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रोड)

२. लांबी - रस्त्याची लांबी ६८.१९ किमीपासून वाढवून ७२.३३५ किमी करण्यात आली.

३. खर्च - २०२१ मध्ये १०,१५९.८२ कोटी रुपये इतका होता, आता १९,९३२.९८ कोटी रुपये इतका आहे.

४. पुणे-नगर रोड आणि सोलापूर महामार्गाला हा रस्ता जोडला जाईल.

पश्चिम विभाग

१. मार्ग - उर्से ते वरवे बुद्रुक (सातारा रोड)

२. खर्चे - १२,१७६ कोटी रुपयांवरुन २२,७७८.०५ कोटी रुपयांवर गेला आहे.

एमएसआरडीसीद्वारे ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पदाधिकाऱ्यांना अंतिम टप्प्यातील भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महामंडळाने बांधकामासाठी ५ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

टप्पा १ - सोलू इंटरचेंज ते वडगाव शिंदे (४.७ किमी)

टप्पा २ - पुणे-अहमदनगर रोड ते सोलापूर रोड (७१.८९ किमी)

टप्पा ३ - पुणे-सोलापूर रोड ते पुणे-सातारा रोड (२१.२३ किमी)

टप्पा ४ - पुणे-सातारा रोड ते परंदवाडी इंटरचेंज (४४.९० किमी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT