आता पुणेकरांना एटीएम मधून मिळणार दूध Saam Tv
मुंबई/पुणे

आता पुणेकरांना एटीएम मधून मिळणार दूध

या एटीएममधून अगदी 10 रुपयांपासून म्हशीचे दूध उपलब्ध होणार आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - कोरोना Corona काळात अनेक जणांना सोशल डिस्टन्सिंगचे Social Distance महत्व समजले. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने सोशल डिस्टन्सपाळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुण्यातील दुकाने देखील लवकर बंद होत असतात. यातच पुण्यात गोपी डेअरीच्या Gopi Dairy वतीने पहिले म्हशीच्या ताज्या दुधाचे एटीएम Milk ATM सुरू करण्यात आले आहे.

कोरोना सदृश्य परिस्थितीत सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. या परिस्थितीत हे दुधाचे एटीएम उपयोगी पडणार आहे. यामध्ये चार डिग्री सेल्सिअसपर्यंत एटीएमचे तापमान असणारा आहे. या एटीएममधून अगदी 10 रुपयांपासून म्हशीचे दूध उपलब्ध होणार आहे.

हे देखील पहा -

म्हणजेच गरजेनुसार त्या एटीएम मधून दूध घेता येणार आहे. कोरोना सारख्या परिस्थितीत दुकाने अर्धवेळ बंद असतात. परंतु या दुधाच्या एटीएममधून कुठल्याही वेळी दूध मिळू शकणार आहे. एटीएममधले दूध शुद्ध ताजे व प्रक्रिया न केलेले असणार आहे.

एटीएममध्ये दुधाचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कायम ठेवण्यात येते. त्यामुळे त्याची गुणवत्ता टिकते. ग्राहकांना बाजारात अर्धा लिटरच्या पुढे दूध घ्यावे लागते परंतु आता पुणेकरांना एटीएम मधून त्यांना गरजेनुसार दहा रुपयांपासून ते पुढे कितीही दूध घेता येईल.

ग्राहकांनी जर स्वतःचे कंटेनर आणले तर आम्ही प्लास्टिकचा वापर देखील टळणार आहे. हे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहेत. आनंद कुलकर्णी हे इंजिनिअर असून ते 91 सालापासून दुधाचा व्यवसाय करतात. मात्र गोपी डेअरीच्या वतीने सुरू करण्यात आलेली भन्नाट संकल्पना पुणेकरांच्या पसंतीस नक्की उतरणार यात काही शंका नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

SCROLL FOR NEXT