Pune Municipal Corporation 10 percent water cut from October 16 saam tv
मुंबई/पुणे

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Pune Water Supply Update: पुणे शहरात १६ ऑक्टोबरपासून पाण्याच्या वापरात किमान १० टक्के कपात करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा, पाणी बचतीचे नियोजन आणि आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत जाणून घेऊ.

Akshay Badve

  • पुणे शहरात १६ ऑक्टोबरपासून पाणी वापरात किमान १० टक्के कपात

  • संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे महापालिकेकडून पाणी बचतीचे नियोजन.

  • आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबतची माहिती समोर

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीवापरात किमान १० टक्के कपात करण्याचे आदेश दिलेत. १६ ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवता यावा, या उद्देशाने आवश्यकतेनुसार पाणीकपात वाढवण्याचेही निर्देशही देण्यात आलेत.

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. पर्जन्यमान कमी राहिल्यानं राज्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यात आलाय. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणसाखळीत सध्या २६.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वर्षभर पाणीपुरवठा झाला पाहिजे या दृष्टीकोनातून पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. दरम्यान आठवड्यातून एक दिवस पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा अधिकृत दिवस, वेळ आणि संबंधित भागांबाबत पुणे महानगरपालिकेनं अजून कोणती माहिती दिली नाहीये.

पुणेकरांनी पाण्याचा वापर कसा करावा?

महानगरपालिकेच्या सूचनांनुसार, नागरिकांनी दैनंदिन कामांसाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. आंघोळ, भांडी धुणे आणि कपडे धुणे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा. घरातील तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील नळ, फ्लश टाक्या आणि पाइपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करावी.

बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. तसेच सार्वजनिक आणि खासगी वाहन धुलाई केंद्रे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन धुणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करणे यासाठी महापालिकेचे पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

खासगी आणि सार्वजनिक जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. खासगी तसेच महापालिकेच्या उद्यानांमध्येही पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खासगी महाविद्यालयांच्या वसतिगृह व्यवस्थापनानेही पाण्याची काटकसर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीगळती आढळल्यास महापालिकेला माहिती द्या

शासकीय आणि महापालिकेच्या मालकीच्या इमारतींमधील नळजोड, वॉशरूम, फ्लश टाक्या आणि पाइपलाइन तपासून गळती बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सार्वजनिक ठिकाणी पाणीगळती, फुटलेल्या जलवाहिन्या किंवा पाण्याचा अपव्यय आढळल्यास नागरिकांनी तातडीने पुणे महानगरपालिकेला त्याची माहिती द्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT