PUNE DENGUE & MALARIA CASES RISE AFTER HEAVY RAINS | MAHARASHTRA HEALTH ALERT Saam tv
मुंबई/पुणे

Dengue Alert : पुणेकरांनो काळजी घ्या! साथीच्या आजारांचा धोका वाढला, डेंग्यूचे तब्बल ३,७६२ रुग्ण

Dengue Malaria Alert : राज्यात झालेल्या दमदार पावसानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे ३,७६२ आणि मलेरियाचे २,०३६ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

Akshay Badve

  • पुणे जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे ३,७६२ आणि मलेरियाचे २,०३६ रुग्णांची नोंद

  • मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढली

  • लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन

राज्यात यंदा झालेल्या दमदार पावसामुळे डास मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याचा परिणाम म्हणून साथीच्या आजारांचा धोका देखील वाढला आहे. विशेषतः डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. २१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे ३ हजार ७६२, तर मलेरियाचे २ हजार ३६ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांना अंडी घालण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराच्या परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुण्यात २१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे ३ हजार ७६२, तर मलेरियाचे २ हजार ३६ रुग्ण आढळून आल्याची माहिती

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहर व ग्रामीण भागात मोहीम राबवण्यात येत आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

साथीच्या आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही संयुक्तपणे जबाबदारी पार पाडल्यास परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती, भाजपच्या खासदाराला केंद्राकडून जबाबदारी

Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' ५ मंदिरांमध्ये पाहायला मिळतो गणेशोत्सवाचा अद्भुत नजारा, दर्शनाला नक्की जा

मुंबईत‘स्पेशल २६’ चित्रपटासारखा थरार! आयकर अधिकारी बनून कोट्यवधींची खंडणी, ६ जणांच्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करणार

Naldurg Fort : बोरी नदीपासून पाणीमहालापर्यंत नळदुर्ग किल्ल्याची 'ही' ६ रहस्य तुम्हाला माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT