Shreya Maskar
यंदा गणपतीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट द्या. मोरेश्वर मंदिर (श्री मयुरेश्वर मंदिर) हे मोरगाव, पुणे जिल्हात वसलेले आहे.
भीमा नदीच्या काठावर सिद्धिविनायक मंदिर वसलेले आहे. गणपती उजव्या सोंडेचे (दक्षिणमुखी) गणपती मानले जातात.
बल्लाळेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात स्थित भगवान श्री गणेशाचे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे.
वरदविनायक मंदिर कर्जतजवळ वसलेले आहे. येथील एक तेलाचा दिवा (नंदादीप) १८९२ पासून अखंड तेवत आहे. मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे.
श्री चिंतामणी विनायक मंदिर थेऊर हे हवेली तालुक्यातील थेऊर गावात, पुणे जिल्ह्यात वसलेले आहे.
गिरिजात्मज गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील लेण्याद्री पर्वतावर असलेले एक प्राचीन गुहा मंदिर आहे.
विघ्नहर मंदिर (विघ्नेश्वर मंदिर) हे पुणे जिल्ह्यातील ओझर येथे कुकडी नदीच्या काठावर वसलेले भगवान गणेशाचे एक प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या रांजणगाव येथील रांजणगाव हे प्रसिद्ध महागणपती मंदिर अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.