Pune Rave Party Saan Tv
मुंबई/पुणे

Pune Rave Party: पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण? खडसेंच्या जावयाच्या वकिलांना शंका

Pune News: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील सातही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. या आरोपींची पोलिस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी खडसेंच्या जावयाच्या वकिलांनी अनेक शंका उपस्थित केल्या.

Priya More

Summery -

  • पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू आहे

  • आरोपींची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले

  • खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी कोर्टात अनेक शंका उपस्थित केल्या

  • रेव्ह पार्टीत आलेली ती महिला कोण? असा सवाल त्यांनी केला आहे

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलीये. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आलीये. अटकेत असलेल्या सातही आरोपींची पोलिस कोठडी आज संपली असून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. सध्या कोर्टामध्ये आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद सुरू आहे. यादरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी अनेक शंका उपस्थित केल्या. 'पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? ती महिला कोण आहे?, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठीच त्या महिलेला तिथे आणले असावे अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे यांनी कोर्टात असे सांगितले की, 'माझ्या आरोपीवर ट्रॅप लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं गेलं. मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचं आहे याचा उल्लेख नाही. अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. ज्या महिलेच्या बॅगमधून अमली पदार्थ आले त्यांना तुम्ही न्यायालयीन कोठडी मागता. पहिल्या रिमांडमध्ये आम्ही सहकार्य केलं.'

विजय ठोंबरे यांनी युक्तीवादादरम्यान अनेक शंका उपस्थित केल्या. आम्हाला अडकवण्यासाठीच त्या महिलेला आणण्यात आले होते असे ते म्हणाले. 'आज सुद्धा खोटी रिमांड घेऊन येत आहेत? जे व्हिडिओ व्हायरल केले त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमधून अमली पदार्थ आहेत. राजकीय व्यक्तीच्या जवळचा माणूस असल्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी मिळावी? असे म्हणत आहेत.' तसंच, 'आम्हाला अडकविण्यासाठी त्या महिलेला तिथे आणलं गेलं का? २.७० ग्रॅम कोकेन आढळून आल्याचं सांगितलं गेलं. पण त्यातल्या पिशवीचे वजन २ ग्राम आहे म्हणजे किती मिलीग्रॅमचा हा साठा होता. प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी.', अशी मागणी विजय ठोंबरे यांनी केली.

तसंच, सरकारी वकीलांनी कोर्टात असा युक्तीवाद केला की, 'पहिल्या दिवसापासून पोलिसांनी या प्रकरणाचा काय तपास केला आहे. सीडीआर सुद्धा पोलिसांनी मिळवला आहे. राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टीमधील काय सहभाग आहे हे अजून तपासायचं आहे.' तर पोलिसांनी कोर्टात अशी माहिती दिली की, 'आरोपीचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे, तो हुक्का भरत होता. अमली पदार्थ कुठून आणले तर आरोपी एकमेकांचे नाव घेत आहेत. अमली पदार्थाबद्दल माहिती दिलेलेली नाही. २ महिला यांना न्यायालयीन कोठडी मिळावी. इतर ५ जणांना पोलिस कोठडी मिळावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi Death: 'सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीतच'; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Viral Video : मुंबईत वाहतूक कोंडीचा ‘डॉग शो’! चालकाने गाडी रस्त्यावरच सोडली, ड्रायव्हर सीटवर बसवला पाळीव कुत्रा

Beed Crime News: आई घरी नसताना मुलीला बनवायचा वासनेचा बळी; नराधम बापाला आजीवन कारावास

Nanded News: नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; २ तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेलं, खळबळजनक VIDEO

Maharashtra Live News Update: बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचं नागपुरात ढोल ताशाचा गजरात स्वागत

SCROLL FOR NEXT