Pune Rave Party Case Blackmailing Objectionable Photos Found in Pranjal Khewalkar Mobile saamtv
मुंबई/पुणे

Pune Rave Party:1487 आक्षेपार्ह फोटो अन् ब्लॅकमेलिंग खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय-काय आढळलं?

Pune Rave Party Case: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी राज्य महिला आयोगाकडे अहवाल सोपवलाय. अहवाल मिळाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा केलाय. खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत.

Bharat Jadhav

  • राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा धक्कादायक खुलासा.

  • प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सापडले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ.

  • या फोटो-व्हिडीओचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी झाल्याचा संशय.

  • खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता.

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कदायक खुलासा केलाय. या प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केलाय.

रेव्ह पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदे घेत हा खुलासा केलाय. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ, तर 1487 आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं. तर 19 व्हिडीओ लैंगिक अत्याचाराचे असल्याची माहिती त्यांनी दिली. या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आल्याची माहिती चाकणकर यांनी दिलीय. मुलींना सिनेमात कामं देतो असं प्रलोभनं दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केलं गेले असा आरोप चाकणकर यांनी केलाय.

रेव्ह पार्टी प्रकरणाचा अहवाल महिला आयोगाकडे मिळाला आहे. पुणे पोलिस आयुक्तांकडून हा अहवाल आयोगाला प्राप्त झालाय. सात आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल अंमली पदार्थ जप्त केलेत. तसेच प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ मिळालेत. यातील चॅटिंग आणि व्हिडिओचा उल्लेख माध्यामांपुढे करता येत नाहीत, असे चाकणकर म्हणाल्या. 'मुलींना अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत.

त्यानंतर त्याचे व्हिडिओ काढले आहेत. या व्हिडिओचा वापर करून मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आलेत. घरात साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचा व्हिडिओ आणि फोटो आक्षेपार्ह अवस्थेतील आहेत. सिनेमात काम देणे आणि इतर प्रलोभन दाखवून मुलींना बोलवले जात होते, असा खुलासा चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT