pune traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Report : पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी, टॉप ५ मध्ये कोणती शहरे? वाचा

global congestion ranking : पुणे तिथे काय उणे !....हे ब्रिदवाक्य अगदी अभिमानाने पुणेकर मिरवत असतात...प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहीले नाहीयेत...असं आम्ही का म्हणतोय...यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट

Saam Tv

पुणे तिथे काय उणे....हे ब्रिदवाक्य अगदी अभिमानाने पुणेकर मिरवत असतात...प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहीले नाहीयेत... जगात अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरतेय...शहरात वाहनांची संख्या वाढल्याने कमी अंतर कापण्यासाठीही बराच वेळ लागतोय...‘टॉम-टॉम’ या डॅनिश संस्थेने जगभरातल्या वाहतूक कोंडीचे सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध केलाय.

संबंधित शहरामध्ये १० किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणार वेळ याचे सर्वेक्षण केलं आहे. आणि या जागतिक वाहतूक कोंडी अहवालात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे...पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागतोय...मुख्य म्हणजे पहिल्या पाचमधील तीन स्थानांवर भारतातील शहरं आहेत....

पुण्यातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी जगात भारी !

शहर - 10 कि मी.साठी लागणारा वेळ

1. बरानकिला (कोलंबिया) - 36 मि. 6 सेकंद

2. कोलकाता - 34 मि. 33 सेकंद

3. बेंगळुरू - 34 मि. 10 सेकंद

4. पुणे - 33 मि. 22 सेकंद

5. लंडन - 33 मि. 17 सेकंद

यावर वाहतूकतज्ज्ञांचं काय मत आहे ते पाहूयात....

एका बाजूला पुणे शहराचा विकास आणि विस्तार चहू बाजूंनी होतोय...तर त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाहतुकीला फटका बसतोय. नेमकी काय कारणं आहेत ते पाहूताय....

पुण्यात यामुळे होते वाहतूक कोंडी

मेट्रोचे विस्तारीकरण

उड्डाणपुलांची कामं

रस्त्यावर पडलेले खड्डे

वाहनांची वाढलेली संख्या

असक्षम वाहतूक व्यवस्था

अरुंद रस्ते

फुटपाथची दुरवस्था

अनधिकृत फेरीवाले

यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनीही आपापल्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर आता चौथ्या क्रमांकावर असलेले पुणे वाहतूक कोंडीतही अव्वल व्हायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT