Pune Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Pune Fire : पुण्यातील रामवाडीत पेट्रोल चोरी करण्यासाठी आलेल्या एका चोराने सहा दुचाकी गाड्या जाळल्या. चंदननगर पोलिसांनी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्याच्या रामवाडी येथून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामवाडीमध्ये एका पेट्रोल चोराने तब्बल सहा मोटारसायकल जाळल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोल चोरी करत असताना चोराने गाड्यांवर बसून सिगारेट पेटवली. त्यानंतर दुचाकी गाड्यांनी पेट घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी चोराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रामवाडी परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल चोरी करण्यासाठी आलेल्या आरोपीने सहा दुचाकी गाड्या जाळल्या. त्याने पेट्रोल चोरताना सिगारेट पेटवली. यादरम्यान गाड्यांनी पेट घेतला. आगीमध्ये सहा मोटारसायकल गाड्या जळून खाक झाल्याचे म्हटले जात आहे.

या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांशी तात्काळ संपर्क केला. पोलिसांनी प्रथमेश बाजीराव पाटील (वयवर्ष २०) या तरुणाला अटक केली आहे. यानेच सिगारेट पेटवून मोटारसायकल जाळल्या होत्या. या तरुणावर आग लागणे (कलम ३२६ -अ) आणि पेट्रोल चोरी करण (कलम ३०३) यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील रामवाडी येथे पेट्रोल चोरी करणाऱ्या एका चोराने सहा मोटारसायकल जाळल्या. सिगारेट पेटवताच मोठा भडका उडाला. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आगीची दाहकता पाहायला मिळत आहे. सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika- Ranveer Daughter: अहाहा! किती गोड दिसतेय, रणवीर आणि दिपिकाची मुलगी, फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

SCROLL FOR NEXT