Rajgurunagar young college girl was killed Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवलं, अत्याचार करुन निर्घृणपणे संपवलं; राजगुरुनगरमधील तरुणीच्या मृत्यूचं गूढ उलगडलं

Pune Rajgurunagar Girl Murder News : राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं तपासांत निष्पन्न झालं आहे. महाविद्यालयीन क्लासला आलेली तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरुन गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

Prashant Patil

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे. यातच आता या तरुणीच्या मृत्यूचं गूढ देखील उलगडलं आहे.

राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं तपासांत निष्पन्न झालं आहे. राजगुरुनगर येथे महाविद्यालयीन क्लासला आलेली तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरुन गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापत करुन भिमानदी पात्रात फेकल्याची माहिती आता समोर आली आहे. लिफ्ट देणाऱ्या नराधमाने पीडित तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे पुणे पुन्हा हादरलं आहे.

लिप्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाने पीडित तरुणीला दुचाकीवरुन घेऊन जाऊन हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दुचाकीवरुन घेऊन जाणाऱ्या आरोपीनेच तरुणीची हत्या केल्याचं पोलिसांची माहिती दिली आहे. अल्पवयीन तरुणीच्या हत्येचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मृतदेह शवच्छेदनासाठी पुण्यातील ससुन रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे.

नेमकं काय घडलं?

राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे.

'कॉलेजच्या क्लासला चालले' असं सांगून ती घरातून निघालेली होती, परंतु तरुणी परतली नाही. नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला. पीडित तरुणीचा खून झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाच वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT