Chandrakant Patil Vs Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील पावसाच्या पाण्यावरुन राजकारण तापलं; चंद्रकांत पाटलांनी दिलं अजित पवारांना आव्हान

याआधी तुमच्याकडे सत्ता होती आमची जेमतेम ५ वर्ष सत्ता होती - चंद्रकांत पाटील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: पुणे शहरात (Pune City) पावसाचे पाणी साचल्यामुळे पुणेकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. शिवाय शहरात साचलेल्या पाण्यावरुन विरोधकांनी भाजपवरती चांगलीच टीका केली आहे. पाच वर्षात पुण्यात भाजपची सत्ता होती तरिही काही काम केलं नाही.

त्यामुळेच पुण्याचे हे हाल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चक्क विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हान दिलं शिवाय, दुसऱ्यांना बोट दाखवताना आपल्याकडे ४ बोट असतात हे लक्षात ठेवावं. पी हळद आणि हो गोरी असे नाही याआधी तुमच्याकडे सत्ता होती आमची जेमतेम ५ वर्ष सत्ता होती असं म्हणत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

पाहा व्हिडीओ -

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, पुणेकरांना मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्रास झाल्याबद्दल पा दिलगिरी व्यक्त करतो.

तर अजित पवार यांना आवाहन करतो की दुसऱ्यांना बोट दाखवताना आपल्याकडे ४ बोट असतात हे लक्षात ठेवावं, पी हळद आणि हो गोरी असे नसते. याआधी तुमच्याकडे सत्ता होती आमची जेमतेम ५ वर्ष सत्ता होती.

या वर्षी इतर वर्षापेक्षा जास्त पाऊस (Rain) झाला अशा घटना घडू नये यासाठी पाण्याचे निचरा त्याचप्रमाने वाहतूक कोंडी या दोन्ही गोष्टींचा उपाय योजना हाती घेणार आहे. वेळेत कामं न झाल्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे मला अभ्यास करायचा आहे की नेमकं काय झालं. शिवाय रखडलेल्या कामांचा अहवाल घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. नाले रुंद करणे, आणि इतर कामं आम्ही करणार आहोत.

वाहतूक कोंडीवरती पण ठोस उपाय करु असं आश्वासन त्यांनी या कार्यक्रमादरम्यान दिलं. तर पावसाचा दिवशी जिल्हाधिकारी, आयुक्त आम्ही जागे राहून आढावा घेत होतो. आम्हीही लक्ष ठेऊन होतो असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कधी झाली नाही, होत नाही. तरीदेखील आमच्या पक्षात प्रत्यक्षात लोकशाही आहे. नुकतेच एका पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही निवडणूक आयोगाने फटकरल्यांनंतर मोठा गाजावाजा करत झाली असं म्हणत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला.

शिवाय यावेळी त्यांनी रोहित पवारांनी आपलं कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप केला होता यावर बोलताना पाटील म्हणाले, पवार कुटूंब आणि राष्ट्रवादी मजबूत आहे, तर त्यांच्या मध्ये फूट का पडेल असे रोहित पवार यांना का वाटत असा प्रतिप्रश्न त्यांनी रोहित यांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या शृंगार वाडीत सभेचे आयोजन सभेची जोरदार तयारी

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात, माजी सरपंच आणि नातीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT