Pune Railway Station
Pune Railway Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन रोज 5 तास राहणार बंद, प्रवाशांचे होणार हाल; वाचा नेमकं कारण

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) यापुढे दररोज पाच तास बंद राहणार आहे. फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे (Platform Widening Works) पुणे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसंच या कामामुळे लांबपल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन दररोज पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. यासाठी दररोज चार ते पाच तास पुणे रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. या काळामध्ये पुणे रेल्वे स्थानकावर एकही गाडी येणार नाही किंवा जाणार नाही.

पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून या कामासाठी 108 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिमॉडेलिंगचे काम सुरू झाल्यानंतर पुढचे काही महिने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरुन 155 रेल्वे गाड्या धावतात. यापैकी 65 गाड्या पुणे विभागातून सुटतात. तर काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन केले जात आहे. फलाट विस्तारीकरणाच्या या कामामुळे पुणे रेल्वे स्थानकावरुन बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकच पाहून याकाळामध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरेल. नाही तर त्यांना रेल्वे स्थानकावरच थांबावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal News : वाऱ्यामुळे वारंवार वीज खंडित; घारफळ उपकेंद्रात ग्रामस्थांची तोडफोड, ऑपरेटरलाही केली मारहाण

Today's Marathi News Live : नाशिकमधील मोदींच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल; गिरीश महाजन यांचा दावा

संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारामारी, Video Viral

BCCI Head Coach: ना लक्ष्मण,ना गंभीर; द्रविडनंतर हा परदेशी खेळाडू होऊ शकतो भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक

Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

SCROLL FOR NEXT