railway Mega Block News AI Image
मुंबई/पुणे

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Pune Railway Mega Block News : पुणे रेल्वे स्थानकातील यार्डमध्ये १३ सप्टेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Alisha Khedekar

  • १३ सप्टेंबरला पुणे रेल्वे यार्डमध्ये ९ तासांचा मेगाब्लॉक

  • पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे, पुणे-लोणावळा आणि लोणावळा-शिवाजीनगर लोकलच्या फेऱ्या रद्द

  • डेक्कन एक्स्प्रेसच्या संबंधित फेऱ्यांवरही ब्लॉकचा परिणाम होणार

  • रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून नियोजन करावे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सुट्टीनिमित्त घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक जाणून घ्या,कारण पुणे रेल्वे स्थानकातील यार्डमध्ये महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी रविवारी (१३ सप्टेंबर) तब्बल नऊ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असून, त्याचा थेट परिणाम पुणे स्थानकातून धावणाऱ्या काही लोकल, एक्स्प्रेस आणि डेमू गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

का घेण्यात आला मेगाब्लॉक?

पुणे-दौंड विभागातील पुणे यार्डमध्ये डी.डी.एस. पॉइंट क्रमांक २२८ (आय) आणि २२६ (श्री) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या ५२ किलो वजनाच्या रेल्वे मार्गाचे ६० किलो वजनाच्या मार्गात उन्नतीकरण केले जाणार आहे.या महत्त्वाच्या कामासाठी विशेष वाहतूक तसेच वीज ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे ब्लॉकच्या कालावधीत पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, अप मेन लाइन आणि सीएसएमटी टोकाकडील डाउन मेन लाइनवरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

'या' गाड्या राहणार रद्द

१३ सप्टेंबर रोजी पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे, पुणे-लोणावळा आणि लोणावळा-शिवाजीनगर लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय सीएसएमटी-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस यांच्याही फेऱ्या रद्द राहणार आहेत.

वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित गाडीचे वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्लॉकमुळे वाहतुकीत होणारे बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी प्रवासाचे नियोजन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे. पुणे स्थानकातील रेल्वे पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण आणि मार्गाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत होणाऱ्या या ब्लॉकमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रकाची खात्री करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Account : १, २ की ३ बँक अकाउंट? जास्त अकाउंट्स असतील तर ७ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Homemade Rava Recipe: बाजारातील भेसळयुक्त रव्याला करा बाय बाय! १ रुपया खर्च न करता घरच्या घरी बनवा रवा; महिनाभर राहिल फ्रेश

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

SCROLL FOR NEXT