Chunar Train Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

Pune Train Accident: पुण्यामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. तीन तरुणांना धावत्या ट्रेनने धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. माजंरी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रेनने ३ तरुणांना धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात ही घटना घडली. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. हे तिन्ही तरून फुटबॉलसारखे उडाले. या रेल्वे अपघातामुळे पुण्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे अपघाताची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश नितीन तिंडे, तन्मय महेंद्र तुपे आणि तुषार शिंदे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावं आहेत. हे तिघेही तरुण पुण्यात राहणारे होते. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे झाले.

रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघातामध्ये मृत्यू झालेल्या ३ तरुणांसह ५ जण मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात रेल्वे रूळावर एकत्र आले होते. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रेनने त्यामधील तिघांना धडक दिली. या अपघातानंतर दोघे जण घाबरून घटनास्थळावरून निघून गेले.

रेल्वे अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले आहेत. हे तरूण नेमके या ठिकाणी का गेले होते? याबाबत नेमकी माहिती पोलिस मिळवत आहेत. मृत तरुणांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून मुलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Side Effects: आवळा कोणी खाऊ नये?

Maharashtra Live News Update: देवळाली कॅम्पच्या लहवित परिसरात बिबट्याच दर्शन

Feet Tanning : 10 मिनिटांत पाय होतील गोरे, फॉलो करा या ३ स्टेप

Winter Health : हिवाळ्यात थंड पाणी पिण्याचे फायदे, मात्र लक्षात ठेवा 'ही' महत्त्वाची गोष्ट

Bharti Singh: 'लाफ्टर शेफ्स 3'च्या टीमकडून भारती सिंहला मिळलं बेबी शॉवर सरप्राइज, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT