Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील रस्ते खड्डे मुक्त होणार! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲपद्वारे कारवाई

Pune Potholes News : सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, पुणे

पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे आता खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी एक ॲप सुरू करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित होत आहे.

अ‍ॅपचा फायदा काय?

सुधारित ॲपमुळे खड्ड्याबाबत तक्रार करताच एका क्षणात संबंधितांना तो खड्डा बांधकाम विभागाच्या रस्त्यातील आहे की नाही कळेल. जर तो खड्डा बांधकाम विभागाच्या रस्त्यातील असल्यास संबंधित कनिष्ठ अभियंताकडे तक्रार पाठविल्याचा संदेश येईल. तसेच त्यांच्याकडून पुढील तीन दिवसात तो फोटो पाठवून दूरस्थ करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

खड्डा न भरल्यास कारवाई

खड्डा दुरुस्ती वेळेत न झाल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्याला कारवाई सामोरे जावे लागणार आहे. पुणे शहरा बाहेरील आणि जिल्ह्यात बांधकाम विभागाचे अनेक रस्ते आहेत त्या रस्त्यावर खड्डे दिसल्यास त्यांच्या तक्रार करण्यासाठी हे ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे .

अ‍ॅपद्वारे खड्ड्याचा फोटो काढून तो अ‍ॅपवर डाऊनलोड करता येईल. त्यानंतर तो संदेश कनिष्ठ अभियंताकडे जाईल त्यानंतर संबंधित तक्रारदारास प्रत्युत्तर म्हणून तो रस्ता बांधकाम विभाग आहे की नाही याचे उत्तर मिळेल. रस्ता बांधकाम विभागात असल्यास तक्रार पुढील कारवाईसाठी पाठवली जाईल. कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता या तिन्ही अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी तक्रार जाईल. त्या रस्त्यावर खड्डे बुजवण्याची कार्यवाही ही कनिष्ठ अभियंत्याने तीन दिवसात करणे अपेक्षित आहे. खड्डा न बुजवल्यास अभियंत्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT