Vishal Agarwal Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: विशाल अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांच्यात संबंध काय?, समोर आली मोठी अपडेट

Pune Kalyani Nagar Accident Case: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या तपासातून विशाल अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांच्यातील संबंध उघड झाले आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) आणि अश्फाक मकानदार (Ashfaq Makandar) यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. अश्फाक मकानदारला याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानेच ससूनचा शिपायी अतुल घटकांबळेला ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी पैसे दिले होते. याप्रकरणाचा तपास करत असताना अश्फाक मकानदार आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संबंधाविषयीची महत्वाची माहिती समोर आली आहे. अश्फाक मकानदार हा प्रॉपर्टी एजंट असून तो विशाल अग्रवालसाठी काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी अश्फाक मकानदार आणि विशाल अग्रवाल यांचे संबंध समोर आले आहेत. अश्फाक मकानदार प्रॉपर्टी एजंट म्हणून विशाल अग्रवालचे काम करत होता. अश्फाकने आत्तापर्यंत अग्रवालचे अनेक फ्लॅट एजंट म्हणून विकले आहेत. विशाल अग्रवाल बिल्डर असून पुणे शहरात अनेक ठिकाणी त्याच्या इमारती आहेत. विशाल अग्रवालच्या कंपनीचे अश्फाक मकानदारने आत्तापर्यंत १० ते १२ फ्लॅट विकले असल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे.

याप्रकरणाचा तपास करत असतान काही दिवसांपूर्वी अश्फाक मकानदारने आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ३ लाख रुपयांची देवाण-घेवाण केली असल्याचे उघड झाले होते. अश्फाकने ससून रुग्णालयाचा शिपायी अतुल घटकांबळेला ३ लाख रुपये दिले होते. या पैशांची देवाण-घेवाण पुण्याच्या बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पुणे पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. १९ मे रोजी बाल न्याय मंडळात याप्रकरणी सुनावणी सुरू असताना अश्फाकने अतुलला पैसे दिले होते.

दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल, ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोळ, शिपायी अतुल घटकांबळे, मुंबईतून अटक करण्यात आलेला अश्फाक मकानदार आणि आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT