Pune Porsche Car Accident News Updates:  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Car Accident: पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; मुलाचे वडील आणि दारु देणाऱ्या २ पब चालकांविरोधात गुन्हा दाखल

Pune Porsche Car Accident News Updates: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण- तरुणीचा करुण अंत झाला. या भयंकर अपघाताने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, ता. २० मे २०२४

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर अपघाताने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चालवणारा तरुण हा शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून त्याला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करुन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील विशाल अगरवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या भयंकर अपघाताच्या घटनेने पुणे शहर हादरुन गेले आहे. अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत दोघांचा जीव घेतला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या अपघातात झालेल्या तरुण- तरुणीची नाव आहेत. हे दोघेही आयटी इंजिनिअर असून मुळचे मध्यप्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांंनी मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT