Nashik Loksabha News: मोठी बातमी! EVM मशिनला हार घातला, नावाच्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra Loksabha Election 5th Phase Voting: नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या कार्यकर्त्यांकडून चिठ्ठी वाटप होत असल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Nashik Loksabha News: मोठी बातमी! EVM मशिनची पूजा, नाव असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha Latest NewsSaam TV
Published On

नाशिक, ता. २० मे २०२४

ठाणे, कल्याण, नाशिकसह राज्यातील १३ जागांसाठी लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. सकाळपासून सर्व मतदान केंद्रांवर मतदार गर्दी करताना दिसत आहे. अशातच नाशिक लोकसभेचे उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएम मशिनची हार घालून पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करत शांतीगिरी महाराजांसह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, महायुतीचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यामध्ये लढत होत आहे. आज मतदानाच्या दिवशी शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएम मशिनची हार घालून पूजा केली होती. यावर आक्षेप घेत त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शांतीगिरी महाराज यांचे काही कार्यकर्ते मतदान केंद्रांवर भगव्या रंगाचे कपडे घालून त्यावर जय बाबाजी नाव लिहिलेला लोगो तसेच शांतिगिरी महाराजांच्या नावाच्या आणि बादली चिन्ह असलेल्या स्लीप मतदारांना वाटत असल्याचे आढळून आले होते. यावर पोलिसांनी आक्षेप घेत शांतीगिरी महाराजांच्या चार समर्थकांना ताब्यात घेण्यात आले होते. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Loksabha News: मोठी बातमी! EVM मशिनची पूजा, नाव असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांनी रांगेत उभं राहून केलं मतदान; म्हणाले, मते पैशानं विकत घेता येत नाहीत!

याप्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून मतदानाच्या दिवशी प्रचारावर बंदी असताना देखील प्रचार करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर शांतिगिरी महाराज यांनी अंबड पोलीस ठाण्यात जात कार्यकर्त्यांवर कारवाई का केली? असा जाबही पोलिसांना विचारला. यावेळी पोलीस आणि शांतीगिरी महाराज यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Nashik Loksabha News: मोठी बातमी! EVM मशिनची पूजा, नाव असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Pune Car Accident: हिट अँड रन केस: प्रसिद्ध व्यावसायिक आहेत म्हणून सोडू नका, रविंद्र धंगेकर आक्रमक; पोलिसांना आंदोलनाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com