पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचा काल एक रॅप साँग व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर विशाल अग्रवाल यांच्या मुलाविरोधात संतापाची लाट उसळली. मात्र हा व्हिडिओ त्याचा नसल्याचा दावा वकिलांनी केला. तसेच आता त्याच्या आईने देखील यावर प्रतिक्रिया देत व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा तो नसल्याचा दावा केला आहे.
अल्पवयीन आरोपीच्या आईला कोसळलं रडू
मुलाच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना त्यांनी स्वत:चा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी शिवानी अग्रवाल. माझी सर्व पत्रकार आणि सोशल मीडिया ग्रुप्स यांना विनंती आहे की, अशी माहिती पसरवू नका. व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही. माझा मुलगा डिटेंशन सेंटरमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात असे खोटे व्हिडिओ व्हायरल करू नका, असं म्हणता-म्हणता त्याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये
अल्पवयीन मुलाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने बिल्डर आणि आपल्या वडिलांचा उल्लेख केला आहे. तसेच मी लगेच जामिनावर बाहेर आलोय आणि माझ्याविषयी बोलण्याव्यतीरिक्त तुमच्याकडे काही काम नाही का? मी पुन्हा रस्त्यावर उतरून माझ्या मित्रांसोबत असा खेळ खेळणार, असं म्हणत त्याने रॅप साँग तयार केलं आहे. इतकंच नाही तर त्याने व्हिडिओमध्ये मोठ्याप्रमाणात शिवीगाळ देखील केली आहे.
पुण्यात रविवारी पहाटे पोर्श कारसह अल्पवयीन मुलगा घराबाहेर पडला होता. मद्यधुंद अवस्थेत कार चालवताना त्याच्या कारची एका स्कूटीला जोरदार धडक बसली आणि क्सूटीवरील २ जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला मिळालेला जामीन रद्द करून १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.