Sasoon Hospital Dr Ajay Taware Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: डॉ. अजय तावरेंच्या अडचणी वाढणार, विशाल अग्रवालने दिलेल्या रक्कमेपैकी १ लाख कुठे गेले?

Sassoon Hospital Dr Ajay Taware: विशाल अग्रवालने मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी डॉ. अजय तावरेंना दिलेल्या ४ लाखांपैकी १ लाख रुपये कोणाला देण्यात आले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. अजय तावरे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी वडील विशाल अग्रवाल यांनी डॉ. अजय तावरेंना दिलेल्या ४ लाखांपैकी १ लाख रुपये कोणाला देण्यात आले याची माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे ते १ लाख रुपये कोणाला दिले याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ३ लाख रुपये जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील ते १ लाख रुपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून आरोपी डॉक्टरांना ४ लाख रुपये देण्यात आले. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी हे पैसे देण्यात आले होते. यातील २.५० लाख रुपये ससूनचे डॉ. श्रीहरी हाळनोर तर ५० हजार रुपये ससूनचा शिपाई अतुल घटकांबळे याला मिळाले होते.

या ४ लाखांपैकी १ लाख रुपये कोणाला दिले गेले याचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काही ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. ३ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. पण १ लाख रुपये जप्त करण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यामुळे आता ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे भोवती पुन्हा चौकशीचा फेरा लागणार आहे. या चौकशीतून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आधी देखील सुनावणीदरम्यान कोर्टाला या १ लाख रुपयांप्रकरणी सांगितले होते.

ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे हे सध्या कारागृहात आहेत. आता ते १ लाख रुपये गेले कुठे? याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिस डॉ. अजय तावरेंची चौकशी करणार आहेत. कारागृहात जाऊन अजय तावरेंच्या चौकशीसाठी पोलिसांना परवानगी मिळाली आहे. पुणे न्यायालयाने गुन्हे शाखेला परवानगी दिली. पुणे पोलिसांकडून सध्या पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे. त्याच दृष्टीने डॉ. तावरे यांची येरवडा कारागृहात जाऊन चौकशी करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT