Pune Kalyaninagar Hit And Run Case:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident: ‘पोर्शे' अपघातातील अल्पवयीन मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना; दिल्लीतील संस्थेने ॲडमिशन रद्द केलं

Pune Kalyaninagar Hit And Run Case: बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेने कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला आहे. मुलाच्या वकिलांनी याबाबतची तक्रार बाल न्यायमंडळाकडे दिली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. २७ सप्टेंबर

Pune Porsche Car Accident Update: पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुण्यासह राज्यभरात खळबळ उडालेल्या या पोर्शेचालक अल्पवयीन मुलाला शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेने कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला आहे. मुलाच्या वकिलांनी याबाबतची तक्रार बाल न्यायमंडळाकडे दिली आहे.

पुणे शहरातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र आता या मुलाला पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसल्याचे वास्तव समोर आलं आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण आहे. त्याने दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेत बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केला होता, त्याला याठिकाणी प्रवेशही मिळाला होता.

मात्र अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच संस्थेने त्याला प्रवेश नाकारला अशी तक्रार मुलाच्या वकिलांनी बाल न्याय मंडळात केली. तसेच मुलाच्या शिक्षणात आडकाठी येऊ न देण्याची विनंतीही वकिलांनी बाल न्याय मंडळाकडे केली. याबाबत सरकारी वकिलांनीही 'मुलाच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, या बहुचर्चित अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे.त्यावर अद्याप निकाल झालेला नाही. त्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे. अपघात प्रकरणी मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विविध कलमांनुसार कलमवाढ करण्यात आली आहे. तपासात मुलाचा इतर गुन्ह्यांत देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कलमवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये ४० वर्षे जुनी इमारतीचा स्लॅब कोसळला

विसर्जनाला उशीर! लालबागचा राजा ६ तासांपासून चौपाटीवरच, नेमकं कारण काय? VIDEO

Noni Fruit Juice: त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे 'या' फळाचे ज्यूस, जाणून घ्या आरोग्यदायी गुणधर्म

Nira Devghar Dam : नीरा देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको; म्हसवड- माळशिरस मार्गावरील वाहतूक ठप्प

Pumpkin Seeds : भोपळ्याच्या बियांचे हे जबरदस्त आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT