पुणे शहर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करत देशात १०व्या क्रमांकावर
गेल्यावर्षी २३व्या स्थानावरून यंदा टॉप १० मध्ये पुण्याची मजल
सीएनजी घंटागाड्या, ई-बस, ई-रिक्शा आणि धूळ नियंत्रणाचे उपाय प्रभावी
केंद्र सरकारकडून ३११ कोटींचा निधी; महापालिकेच्या प्रयत्नांना यश
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. पुण्यातील गेल्या वर्षभरापासून वाढती हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न सुरु होते. या अथक प्रयत्नांना यावर्षी राष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळाले आहे. हवेची गुणवत्ता अधिक सुधारल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक आला आहे. गेल्यावर्षी पुणे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने २३ व्या क्रमांकावर होते.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीच्या आधारावर देशातील १३० शहरांमध्ये सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणाच्या निकषांमध्ये बायोमास आणि कचरा जाळल्यामुळे होणारे उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, बांधकाम पासून निर्माण होणारे प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, अन्य प्रकारचे प्रदूषण किती आहे याची तपासणी केली जाते.
केंद्र सरकारतर्फे १५ व्या वित्त आयोगाने हवा प्रदूषण रोखण्यासाठी देशातील प्रमुख शहरांना आर्थिक मदत केली जाते. पुणे महापालिकेला केंद्र सरकारने या कामासाठी ३११ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १६२ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामधून शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी घंटागाड्या, इ बसेस, इ रिक्षा घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
धुळीचे वाढते प्रमाण बघता ते प्रमाण कमी करण्यासाठी त्यावर पाण्याची फवारणी करण्यासाठी गाड्या घेण्यात आल्या आहेत. तसेच हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकाम विभागाने कडक भूमिका घेऊन, बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी हिरवा कापड लावणे, पाणी मारणे यासह इतर उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे.
गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात पुणे शहराचा २३ वा क्रमांक आला होता. ही परिस्थिती लक्षात घेता हवामान खात्याने विचारपूर्वक पॉल उचलत कामे केली. महापालिकेच्या या सततच्या प्रयत्नांमुळे यंदा हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन १० वा क्रमांक आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.