Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात शिवसेना-भाजपची महायुती तुटली? अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

Pune Election: पुण्यामध्ये महायुती तुटली असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे पण कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary -

  • पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत संभ्रम

  • भाजप-शिवसेना जागावाटपावर एकमत नाही

  • अनेक प्रभागात दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर

  • कार्यकर्ते उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत

  • त्यामुळे पुण्यात महायुती तुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे

सचिन जाधव, पुणे

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तासाचा अवधी उरला आहे. असे असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये जागावाटपांचे सूत्र निश्चित झाले नाही. त्यामुळे महायुती तुटल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. महायुती झाली तरीही उमेदवार माघार घेण्याची शक्यता ही मावळली आहे. कारण अद्याप शिवसेनेकडून अर्ज माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले नाहीत.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यात सत्ताधारी महायुतीच्या तीनही प्रमुख घटक पक्षाचे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. जागा वाटपामध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिवसेना निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यामुळे आज शेवटचे काही तास शिल्लक राहिल्याने देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात याकडेच लक्ष आहे.

शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत मात्र महायुती कायम असल्याचा दावा करत आहेत. मात्र दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज अनेक ठिकाणी दाखल केले आहेत. कार्यकर्ते उमेदवारी मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे महायुतीची शक्यता जवळपास मावळल्याचे संकेत पुण्यात दिसत आहेत. शेवटच्या काही तासांत नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lipstick for Skin Tone: तुमच्या स्कीन टोननुसार कशी लिपस्टिक निवडाल?

साला भXX कसा निवडून येतो बघतेच मी, अर्ज माघारीच्या दिवशी भाजपचा राडा; नाशिकमध्ये उमेदवारांमध्ये मारामारी|VIDEO

Maharashtra Live News Update: भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

कोणत्या भाज्यांमध्ये थोडीशी साखर घातल्यास चव वाढते?

Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT