Ajit Pawar saam
मुंबई/पुणे

NCP Melava: युवांची ताकद ही आपल्या पक्षाची प्रेरणा; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, पुणे)

Ajit Pawar In Pimpri Chichawad NCP Yuva Malava:

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी युवकांना समज देत त्यांना काही सुचना केल्या. युवांची ताकद ही आपल्या पक्षाची प्रेरणा आहे. तुम्ही पक्षाचा कणा आहात, असं म्हणत अजित पवार यांनी युवक कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. (Latest News)

राष्ट्रवादीच्या युवा मिशन (NCP Yuva Mission) कार्यक्रमात अजित पवार यांनी तरुण कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला त्यांचे कानदेखील टोचले. यावेळी अजित पवार यांनी १२ ते १९ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचं आवाहन केलं. हा सप्ताह दिमाखात साजरा करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युवकांना सल्ला

युवकांचे हे वय महत्वाचे असते. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्याचं खंडन तातडीनं करा. प्रतिक्रिया देण्यासाठी कोणा वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, त्यातून वाद निर्माण होणार नाहीत याची खात्री करा आणि प्रतिक्रिया द्या असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांनी यांनी यावेळी युवकांना दिला.

सुचना मागवल्या

आता आपण भाजपसोबत का गेलो,हे मी अनेकदा सांगून झालं आहे. मला तेच तेच उकरून काढायचं नाही. आता आपल्याला विकासावर भर द्यायचं आहे. महायुती सरकार नवं युवा धोरण आणणार आहे. या धोरणात नेमकं काय असावं याबाबत तुम्ही काही बाबी सुचवा. तुमच्या ही मतांचा आदर केला जाईल. पूर्वजांचा वारसा अन विचार जपायचा आहे. आपली बदनामी होता कामा नये, याची नोंद घ्यावी. लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) येतायेत.

कदाचित महिन्याने आचारसंहिता लागेल. गटा तटाचे राजकारण करू नका. प्रत्येकाला प्रत्येकाची विचार पटतील असं होत नाहीच. मात्र बहुमत जाणून घ्या, सर्वांच्या मतांचा विचार करूनच पुढं जायचं असतं, यालाच लोकशाही म्हणतात असं अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT