Pune Police Commissioner Amitesh kumar Warn Goons  Saam Tv File Photo
मुंबई/पुणे

Pune Crime: धिंड काढू,'गंगाजल' स्टाइल वापरू; वाहनांची तोडफोड करणाऱ्या कोयता गँगला पुणे पोलीस आयुक्तांचा कडक दम

Pune Police Commissioner Amitesh kumar: पुण्यात वाहनांच्या तोडफोड होत आहे ते लोकांना वाटत असेल पोलीस काय करत नाही. वाहन तोडफोड करणाऱ्या लोकांना पवित्र करण्याची वेळ आली असल्याचा दम पुणे पोलीस आयुक्तांनी भरलाय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस कंबर कसलीय. शहरातील गुंडगिरी मिटवण्यासाठी पुणे पोलीस आता 'गंगाजल स्टाईल' वापरणार आहे. पुणे शहरातील गुंडगिरी, कोयता गँगचा बिमोड करा, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना केल्या. शहरातील वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना आणि कोयता गँगला मकोका लावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले. त्यानंतर पुणे पोलीस यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आलीय.

शहरात वाढलेले चोरीचे प्रकार आणि गुंडगिरी करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आलीय. गुंडांचा बिमोड करण्यासाठी पोलीस मोहीमच हाती घेणार आहेत. गुंडां धडा शिकवण्यासाठी आता पुण्यात गंगाजल स्टाईल वापरणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीना परत देण्याचा कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यात वाहनांच्या तोडफोड होत आहे ते लोकांना वाटत असेल पोलीस काय करतात. वाहन तोडफोड करणाऱ्या लोकांना पवित्र करण्याची वेळ आलीय. पवित्र करण्याची वेळ नक्कीच आली असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून हे काम करावे लागेल. दिंड अशी काढली जाईल की ती लोक नक्की अपवित्र होतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस दल सज्ज झाल्याचं पोलीस आयुक्त म्हणाले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाणार आहे. गुन्हेगारांची धिंड काढण्यात येईल. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना पवित्र नाही तर अपवित्र करून सोडू, असं पोलीस आयुक्त म्हणाले. यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं सांगितलं. त्या उपक्रमातून पोलीस स्टेशनच्या आवारात ज्या गाड्या आहेत, त्या सगळ्या बाजूला करून पोलीस स्टेशन स्वच्छ करू केलं जाईल.

आज पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजनचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी ' वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना आणि कोयता गँगला मकोका लावा.

आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. कोयता गँग, गाड्या तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करा. मकोका लावा. आम्ही काहीही कमी पडू देणार नाही तुम्हाला' असे विधान केलं. आरोपी पकडल्यानंतर त्याची अशी धिंड काढा. अख्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे', असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT