Sharad Mohol Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणाशी आणखी किती जणांचं कनेक्शन? पोलिसांचा तपास सुरु

साम टिव्ही ब्युरो

Sharad Mohol News:

पुण्यातील कोथरुड परिसरातील भरदुपारची वेळ आणि गल्लीत असणारी शांतता...त्यावेळी गल्लीत कुणीही बाहेर नव्हतं. कुख्यात गुंड शरद मोहोळही लग्नाच्या वाढदिवसामुळे गणपती मंदिराच्या दिशेनेच्या जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कारण शरदच्याच एका साथीदारानं त्याच्यावर गोळीबार केला. मोहोळच्याच काही साथीदारांनी मिळून त्याचा गेम केला. या हत्या प्रकरणाने पुण्यात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात आणखी किती जण आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Latest Marathi News)

अन् गल्लीत एकच कल्लोळ माजला

मोहोळच्या अंगावर तीन ते चार जणांनी गोळीबार केला. त्यानंतर शरद थारोळ्यात खाली पडला. शरदच्या दोन साथीदारांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर शरदवर गोळीबार करून पसार झाले. त्यानंतर शरदच्या साथीदारांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठलाच नाही. या गोळीबारानंतर गल्लीत एकच कल्लोळ माजला आणि पुणे हादरलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद मोहोळच्या हत्येच्या बातम्या समोर आल्या आणि मुळशी पॅटर्नची पुन्हा एकदा पुनरावृत्ती पुण्यात झालेली पाहायला मिळाली. शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर या शरद मोहोळच्या साथीदारानेच त्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं. मुन्ना पोळेकरसह अजून सात जणांनी नावं समोर आली आहेत.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. याप्रकरणी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलीये. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या आरोपींची नावं आहेत.

या हल्लेखोरांनी शरदचा गेम केल्यानंतर गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका कारचा सीसीव्हीटी फुटेजही समोर आला आहे. या हल्लेखोरांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सातारच्या दिशेने पळायचं ठरवल होतं. मात्र त्यांचा प्लान फसला आणि आठही जणांना अटक केली. या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. तसंच या प्रकरणाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. त्यामुळे मोहोळसोबतचं अजून किती जणांचं कनेक्शन आहे? किती जणांची नावं समोर येताहेत. हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT