Koyata Gang Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे पोलिस एक्शन मोडमध्ये! कोयता गॅंगविरोधात आत्तापर्यंतची मोठी कारवाई

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने जोरदार दहशत माजवली होती. त्यामुळेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. सार्वजनिक ठिकाणी कोयते दाखवत या गुंडांकडून हल्ला केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या होत्या.

Gangappa Pujari

Pune: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने जोरदार दहशत माजवली होती. त्यामुळेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. सार्वजनिक ठिकाणी कोयते दाखवत या गुंडांकडून हल्ला केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या होत्या. या धक्कादायक प्रकारांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्याचसोबत पोलिसांचाही या कोयता गॅंगला धाक नसल्याचे बोलले जात होते.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता कोयता गॅंगवर जोरदार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. (Pune Police)

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी कोयता गॅंगवर एक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. कॉंम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईत आत्तापर्यंत १०८ पेक्षा अधिक कोयते जप्त करण्यात आले आहेत. संपूर्ण शहरभरात ही कारवाई केली जात असून पुणे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे अंतर्गत या बेधडक कारवाईला सुरूवात केली आहे.

या बेधडक कारवाईत कोयता वापरणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ८० आरोपींना लिस्टही करण्यात आले आहे. या कारवाईबाबत बोलताना पोलिसांनी कोयता गॅंग वगेरे काही नाही, नवीन गुन्हेगार कोयता वापरत आहेत असाही खुलासा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे आभार मानले आहेत. पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगवर कारवाई केल्याबद्दल पुणे पोलिसांचे तसेच मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार असे ट्विट त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT