IAS Pooja Khedkar Business Standard
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

IAS Pooja Khedkar: पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारदार वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस पाठवलीय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात अजून एक अपडेट समोर आलीय. पुणे पोलीस लैंगिक शोषणाच्या तक्रारीची चौकशी करणार आहेत. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याच प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पूजा खेडकर यांना नोटीस बजावलीय. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

पूजा खेडकर यांनी मंगळवारी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात वाशिम पोलिसांत तक्रार दिली होती. आता या प्रकरणाने जोर पकडला असून खेडकर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यलयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केलीय. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलीय. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांचा नव्याने जबाब नोंदवायच ठरवलंय. त्यासाठी पूजा खेडकर यांना पोलिसांनी उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलंय.

पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान पुणे पोलिसांची नोटीस घेऊन वाशीम पोलिसांच्या महिला अधिकारी पूजा खेडकरांकडे वाशीमच्या विश्रामगृहावर पोहचल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT