Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News: शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात; पुण्यात तब्बल १०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात सोमवारी रात्री (१९ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Police seized 100 Crore Drugs

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात सोमवारी रात्री (१९ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापेमारी केली. या छापेमारीत १०० कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune News) ड्रग्स विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. बहुतांश तरुण अंमली पदार्थांच्या सेवनात अडकत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ तस्करांवर थेट कारवाई करा, असे आदेशच पुणे पोलिसांना दिले आहेत.

अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुन्हे शाखेने शहरातील विश्रांतवाडी भागात छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन आढळून आले. (Latest Marathi News)

या मेफेडॉनची किमत तब्बल साडेतीन कोटी रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणालाही संशय येऊ नये म्हणून मीठ विक्रीच्या आडून हे रॅकेट सुरू होतं. सोमवारी पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती.

याच प्रकरणाचा अधिकचा तपास करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी १०० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

SCROLL FOR NEXT