Pune Crime News  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात उडता पंजाब! २५ लाख रूपयांचे अंमली पदार्थ जप्त, उच्चभ्रू परिसरात मोठी कारवाई

Pune Police Drug Bust: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ लाख रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची उच्चभ्रू विमाननगर आणि मार्केटयार्ड परिसरात कारवाई केली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्हेगाराच्या घटनांमुळे शहराचं नाव वेगळ्याच दृष्टीनं चर्चेत आहे. पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्स आढळून आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ लाख रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. हे अंमली पदार्थ उच्चभ्रू विमाननगर आणि मार्केटयार्ड परिसरातून जप्त करण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल २५ लाख रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. उच्चभ्रू विमाननगर आणि मार्केटयार्ड परिसरात पुणे पोलिसांना कारवाई करत ड्रग्स जप्त केले आहेत. एकूण तीन कारवायांमध्ये २५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन (एम.डी) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे कर्मचारी विमाननगर परिसरात गस्तीवर असताना एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे आढळून आले.

संशयितरित्या वावरत असल्याचं आढळून आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यानं त्याची चौकशी केली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव कुमेल महम्मद तांबोळी असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १९ लाख रुपयांचे ८३ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.

दुसर्‍या कारवाईत मार्केटयार्ड परिसरात पोलिसांना एका आरोपीकडून गांजा जप्त केला आहे. सैफन ऊर्फ शफिक इस्माईल असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एकूण ७ हजार रुपयांचे ३५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आले आहे.

तसेच तिसर्‍या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी विमाननगर परिसरातून अंमली पदार्थ जप्त केला आहे. २४ वर्षीय किरण तुजारे याच्याकडून एकूण ६ लाख २७ हजार रुपयांचा ३० ग्रॅम ३५ मि.ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday lucky zodiac signs: आज होणार अनपेक्षित लाभ; रविवारी 'या' ४ राशींना मिळणार पैसा, शांतता आणि संधी

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

लाडक्या बहिणींनो E-KYC केलं की नाही? १५०० अडकतील, स्टेप बाय स्टेप घरीच करा E-KYC

Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

Google Maps Vs Mappls: गुगल मॅप्सला विसरून जा! MAPPLS अ‍ॅपमुळे प्रवाशांना करता येणार सूसाट प्रवास, वाचा खास वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT