मुंबई/पुणे

Pune News : गर्भवती मुलीला रुग्णालयात नेलं, डॉक्टरांना शंका येताच आई-वडील गोत्यात; पुण्यात नेमकं काय घडलं?

Pune Crime News : आई-वडिलांनी थाटामाटात मुलीचा विवाह लावून दिला. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांना एक शंका आली अन् आई-वडील गोत्यात सापडले.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

आई-वडिलांनी थाटामाटात मुलीचा विवाह लावून दिला. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांना एक शंका आली. त्यांनी मुलीला तिचे वय विचारले. ती अल्पवयीन असल्याचं कळताच डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत मुलीचा जबाब घेतला. अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्याप्रकरणी आई-वडिलांसह तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हा धक्कादायक प्रकार पुण्यातील सिंहगड परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिचे आई वडील सिंहगड रस्ता परिसरात राहण्यास आहेत. मुलीचे वय १७ वर्षे पाच महिने होते. संबंधित मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई वडिलांनी तिचा विवाह २७ वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिला होता.

विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. तिच्या आई-वडिलांनी उपचारासाठी तिला एका रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता त्यांना एक शंका आली. डॉक्टरांनी विश्वासात घेऊन तिला वय विचारले असता, ती अल्पवयीन असल्याचं समोर आलं. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

सिंहगड रस्ता पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्‍सो), तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले यांनी फिर्याद दिली आहे. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT