Nilesh Ghaywal news update  Saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

Nilesh Ghaywal news update : पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ परदेशात पळाला.. आणि त्यानंतर पोलिस यंत्रणेला जाग आली.. घायवळसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे.. अशातच पोलिसांनी घायवळच्या घरावर धाड टाकलीय.. या धाडीत पोलिसांना नेमकं काय सापडलं? घायवळला नेमकं कोण पोसतयं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन घायवळ थेट स्वित्झर्लंडला पोहोचला आणि नाचक्की झालेल्या पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली. निलेश घायवळाच्या कोथरुड परिसरातील घरावर पोलिसांनी छापा टाकला ..या छाप्यात पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रं जप्त केलीत. या छाप्यात नेमकं काय काय सापडलं पाहूयात.

छापेमारीदरम्यान घायवळच्या घरातून जिवंत काडतुसं, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील काही महत्त्वाच्या फाइल्स, सातबारा, जमिनींची कागदपत्रं आणि जमीन खरेदीचे साठेखत अशी मालमत्तांशी संबंधित कागदपत्रं पोलिसांना मिळाली आहेत. घराबरोबरच घायवळच्या कार्यालयावरही पुणे पोलिसांनी कारवाई केलीय..

या प्रकरमावरून आता विरोधक आक्रमक झालेत. घायवळसारख्या गुन्हेगाराला कोणी पोसलं? असा सवाल रवींद्र धंगेकरांनी विचारलाय.. तर घायवळमागे कुठलीही तरी मोठी अदृश्य शक्ती आहे, असं म्हणत सुप्रिया सुळेंनीही गुन्हेगारी प्रवृत्तीवर बोटं ठेवलयं.

मुळात मकोकाचा गुन्हा असणारा घायवळ इतक्या सहजासहजी परदेशात कसा पळून जातो? राजकीय वर्तुळातही वावर असलेल्या घायवळचा खरा आका कोण? पासपोर्ट देताना पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं.? सर्वसामान्याचं जगण मुश्किल करणाऱ्या गुन्हेगारांना पाठिशी घालण्याचं कारनामा नेमकं कोण करतंय.?. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या निमित्तानं दहशत पसरवणाऱ्या घायवळला नेमकं कोण पोसतयं? असे अनेक प्रश्न निर्माण होतायत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT