Pune Police News :  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Police : गुन्हेगारांनो मान बाहेर काढाल तर...; निलेश घायवळ टोळीतील गुंडांच्या गोळीबारानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

Pune Police News : निलेश घायवळ टोळीतील गुंडांच्या गोळीबारानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुणे पोलिसांनी गुंडांना कारवाईचा मोठा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीने गोळीबार केल्याने खळबळ

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अ‍ॅक्शन मोडमध्ये कारवाई सुरू

पुण्यात सध्या ११ मोठ्या आणि ८८ पेक्षा जास्त छोट्या गँग सक्रिय

पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील गुंडांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कोथरुडमध्ये निलेश घायवळच्या टोळीने गोळीबार केला. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला होता. गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. तर काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर हत्या प्रकरणानेही खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. गुन्हेगारांनी मान बाहेर काढल्यास गजाआड जाणार, अशा इशारा गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिला आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पिंगळे म्हणाले की,'पुण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ११ मोठ्या गॅंग कार्यरत आहेत. तर ८८ पेक्षा जास्त छोट्या गॅंग पुण्यात कार्यरत आहेत. या गँगवर वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हे शाखा कारवाई करत असते. पोलिसांकडून गुंडांवर तडीपार, मकोकासारख्या कारवाई केली जातात'.

'पुणे पोलिस या गॅंगच्या विरोधात काम करत आहेत. पुण्यातील गुन्हेगारीच्या इतिहासात अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याच्यातून महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना आता प्रत्येक गुन्ह्याशी निगडित असलेला गुन्हेगार शोधायचा आहे. आता गुन्हेगाराची लायकी दाखवून त्यांना न्यायालयाच्या दारात उभं करण्याचं काम पोलीस करत आहेत, असे पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी सांगितलं.

'पुण्यातील ज्या गुन्हेगारांनी डोके बाहेर काढायचं काम केलं. ते आता गजाआड आहेत. तर राहिलेल्या गुन्हेगारांना सूचना आहे की, मान बाहेर काढाल तर मान गजाआड जाणार, असा इशारा देखील त्यांनी दिला.

'अल्पवयीन गुन्हेगार हा समाजाला धोका आहे. सिनेमा रिल्स यामध्ये जे दिसतं, ते समोर येत आहे. आम्हालाही अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई करताना अडचण येत असतात. निर्भया प्रकरणानंतर कायद्यात बदल झाले आहेत. आम्ही अल्पवयीन गुन्हेगारांचं मन परिवर्तन करण्याचं काम करत आहोत. आंदेकर प्रकरणी तपास सुरू आहे. यात अनेक प्रक्रिया पुढे येत आहेत. ज्यांनी तपास प्रक्रियेला अडचण आणली त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोथरूड गोळीबार प्रकरणाचा तपास कोथरूड पोलीस करत आहेत, असे पुणे पोलीस उपायुक्त पिंगळे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT