Pune Ganeshotsav  x
मुंबई/पुणे

Pune : पुणे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही 'दोन' गणेश मंडळ प्रथेनुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार?

Pune Ganeshotsav : अनंत चतुर्दशीला पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणूकानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ या मंडळांनी मिरवणूकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Akshay Badve

  • पुणे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ यांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

  • पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरळीत आणि वेळेत विसर्जन पार पाडण्यासाठी नियोजनाबाबत चर्चा झाली.

  • यंदा अनंत चतुर्दशीला मानाच्या पाच गणपतींनंतर या दोन्ही मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होणार आहे.

Pune News : अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ परंपरेनुसार आणि प्रथेनुसार म्हणजेच रात्रीच्या सत्रात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. आज पुणे पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "आज अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ यांच्या उत्सव प्रमुख आणि अध्यक्ष यांच्याशी बैठक आयोजित केली गेली होती. यावेळी उत्सवसोबत विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा करण्यात आली. गर्दीचे नियोजन त्यासोबतच वेळेत आणि सुरळीत विसर्जन मिरवणूक संपन्न व्हावी याविषयी काही मुद्दे चर्चेत होते.

'त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या पूर्वीच्या वेळेनुसार विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली. या विनंतीला मान देत दोन्ही मंडळांनी सकारात्मक निर्णय घेऊन पारंपरिक आणि प्रथेनुसारच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतले आहेत', असे वक्तव्य पुणे पोलीस आयुक्य अमितेश कुमार यांनी केले आहे.

यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे पाच गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता. मानाच्या पाच गणपतींमध्ये शेवटचा म्हणजेच मानाचा पाचवा कसबा गणपती मार्गस्थ होताच हे दोन्ही मंडळं मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती या दोन्ही मंडळांच्या प्रमुखांनी ३१ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. येत्या २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kale Khajoor Benefits: रोज सकाळी २ काळे खजूर खाण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; तिकीट कापल्याने अनेक नेत्यांची अजित पवार गटात एन्ट्री

Maharashtra Election: सोलापुरात भाजपला डच्चू; शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

Maharashtra Live News Update: उल्हासनगरात भाजपाला मोठा धक्का, भाजपच्या जयश्री पाटील यांचा टीओकेमध्ये प्रवेश

मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT