Pune Police Raid In Budhwar Peth Saam TV marathi
मुंबई/पुणे

Pune News: बुधवार पेठेत मध्यरात्री मोठं कोम्बिंग ऑपरेशन, पोलिसांकडून ४१ इमारतींची झडती; ४२६ महिला अन् २९० पुरुषांची चौकशी

Pune Police Raid In Budhwar Peth: पुण्यातील बुधवार पेठेमध्ये पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईमध्ये पोलिसांनी ४१ इमारतीची झडती घेतली.

Priya More

Summary -

  • पुण्यातील बुधवार पेठेत मध्यरात्री मोठं कोम्बिंग ऑपरेशन

  • ४१ इमारतींची झडती घेऊन ७०० हून अधिक जणांची तपासणी

  • २ बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना घेतलं ताब्यात

  • अमली पदार्थासह एका तरुणाला अटक

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४१ इमारतींची झडती घेतली. यामध्ये शेकडो महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली. तर ४२६ महिला आणि २९० पुरूषांची चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी २ बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं. तर अमली पदार्थासह एका तरुणाला अटक करण्यात आली.

पुणे शहरातील बुधवार पेठेमधील रेड लाईट परिसरात अवैध धंदे सुरू असून काही बांगलादेशी महिला आणि अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं. या कारवाईदरम्यान बुधवार पेठेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी नाकाबंदी देखील केली होती. लातूरचा रामेश्वर बिभीषण बिराजदार (वय ३१ वर्षे) या तरुणाची पोलिसांनी तपासणी केली. त्याच्या ताब्यातून ७ ग्रॅम चरस आणि ३ इंजेक्शन जप्त करण्यात आले. तर दोन संशयित बांगलादेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कोम्बिंग ऑपरेशननंतर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा आणि परिमंडळ १ च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

या कोम्बिंग ऑपरेशनसाठी ६ पोलिस उपायुक्तांसह विविध पोलिस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेतील पथके तैनात करण्यात आली होती. या ऑपरेशनमध्ये ८ सहाय्यक आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, ५५ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच सुमारे ३७५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांकडून या अशाप्रकारच्या धडक कारवाई इथून पुढे देखील सुरूच राहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात खटाखट जमा होणार ₹६००० रुपये

Prathamesh Kadam : रील स्टार प्रथमेश कदमचा मृत्यू नेमका कशाने झाला? आईने रडत रडत सांगितले खरे कारण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: जळगावात वीज कर्मचारी आज संपावर

मोठी बातमी! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीची महत्त्वाची अपटेड समोर, ‘या’ १४ जिल्ह्यांना सर्वाधिक पैसे

धक्कादायक! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा बुधवार पेठेत पाठवले, पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT