Pune Porsche Car Accident Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Case : पोर्शे कार कोण चालवत होता? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Pune Porsche Accident Case News : पुणे पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेत कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या अपघात प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला, याविषयी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्वाची माहिती दिली.

Vishal Gangurde

पुणे : पोर्श कार अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील वातावरण तापलं आहे. या अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेत कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला, याविषयी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच पोर्श कार आरोपी मुलगा चालवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाविषयी माहिती दिली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'सकाळी आठ वाजताच्या सुमारास ३०४ अ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानतंर ११ वाजण्याचा सुमारास ३०४ कलमान्वये गुन्हा जोडण्यात आला. पुढे बाल न्याय हक्क मंडळाकडे या आरोपीला सज्ञान म्हणून गृहीत धरावे, याची मागणी केली.

'सज्ञान करण्याबाबतची एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेत वेळ लागतो. आता आम्ही आता पब मालक आणि मुलाच्या वडिलांवर गुन्हा नोंदवला. ३०४ च्या गुन्हा नोंद झाल्यामुळे मुलाला १४ दिवसांची कोठडी सुनावली. आरोपीला सज्ञान म्हणून प्रकरण चालवावं, याची प्रक्रिया झाली आहे, असे अमितेश कुमार पुढे म्हणाले.

'याच काळात सर्व आरोपी अटक करण्यात आली आहे. काहींना ३ दिवसांची कोठडी, काहींना ४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या संवेदनशीलपणे प्रकरणचा तपास सुरु आहे. सर्व तांत्रिक पुरावे तपासत आहोत. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का, याचा तपास सुरु आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहोत. कोर्टात आमची बाजू ठामपणे मांडण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.

ब्लड रिपोर्टबाबत पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, 'ब्लड रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेला नाही. ब्लड रिपोर्ट सुरुवातील घेण्यात आला होता. त्या रिपोर्टला फोरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आलं होतं. काही माहिती समोर येत होती. या प्रकरणात आणखी रिपोर्ट घेण्यात आला. दोन्ही रिपोर्टचे डीएनए सारखे आहे का, आरोपी अल्पवयीन आहे का, या दृष्टिकोनातून तपास सुरु आहे'.

'पोर्श कार आरोपी मुलगा चालवत होता. यासाठी तांत्रिक पुरावे एकत्र केले आहेत. पुराव्याच्या आधारावर आरोपीच गाडी चालवत होता. आरोपी पूर्ण शुद्धीत होता. त्यांना होणाऱ्या कृत्याची कल्पना होती, असेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT