Pranjal Khewalkar Booked in Pune cyber police station  saam tv
मुंबई/पुणे

खडसेंच्या जावयाचे पाय आणखी खोलात, आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो समोर, ८ महिलांचा दावा

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ. ८ महिला पोलिसांशी संपर्कात, आक्षेपार्ह व्हिडिओ-फोटोचा दावा. पुणे पोलिसांची तपासणी सुरू.

Namdeo Kumbhar

  • प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

  • ८ महिलांनी पोलिसांशी संपर्क करून तक्रारीची तयारी

  • मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि चॅट सापडल्याचा पोलिसांचा दावा

  • खराडी पार्टी प्रकरण अधिक गंभीर वळणावर

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सात ते आठ महिलांनी पोलिसांसोबत संपर्क केला असून तक्रार दाखल करणार असल्याचे समजतेय. महिलांकडे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे खराडी पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी कोर्टातही खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा केला होता.

गुन्हे आणखी वाढणार -

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सात ते आठ महिला पुणे पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना या महिलांची सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलेय. त्याचं बरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळून आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे. सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ

खराडी पार्टी प्रकरणात अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी कोर्टात धक्कादायक माहिती दिली आहे. खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडले आहेत, अशे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत 'ऐसा माल चाहिए' असा मेसेज केल्याचे सांगण्यात आलेय. हे सर्व सांगत पोलिसांनी खेवलकर यांची कोठडी मागवून घेतली.

प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, खराडी पार्टी प्रकरणामुळे ते चर्चेत आले आहेत. सुमारे ७-८ महिलांनी खेवलकर यांच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी कोर्टात खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि चॅट असल्याचे सांगितले आहे. णखी महिलांकडून तक्रारी आल्यास प्रांजल खेवलकर यांच्यावर नवीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT