Sharad Pawar vs Ajit Pawar NCP  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Breaking News: शरद पवार गटाच्या ९ पदाधिकाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा; नेमकं कारण काय?

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

Pune NCP Latest Marathi News

एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाची बैठक सुरू असताना दुसरीकडे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ९ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजित पवार यांच्या नावाच्या कोनशिलेची फरशी काढून गोंधळ घातल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांनी डेंगळे पुलाजवळील पक्ष कार्यालयात बुधवारी निषेध बैठक घेत जोरदार घोषणाबाजी केली होती.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे नाव असलेली कार्यालयाच्या उद्घाटनाची कोनशिलेची फरशी काढून टाकली. तसेच या फरशीवरील अजित पवार यांचे नाव हातोड्याने तोडून टाकले. ही बाब अजित पवार गटाच्या काही पदाधिकार्‍यांना समजताच त्यांनी कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली.  (Latest Marathi News)

यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ९ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT