Pimpri Chinchwad Firing Case Saam tv
मुंबई/पुणे

Pimpari Chichwad Crime: मध्यरात्री हवेत गोळीबार, सकाळी पोलिसांनी पिंपरीच्या २ नेत्यांना ठोकल्या बेड्या

Pimpri Chinchwad Firing Case: पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली. याप्रकरणी माजीनगरसेवक आणि आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबाराची घटना घडली होती. काळेवाडी येथील नडेनगरमध्ये ही घटना घडली होती. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाने आणि त्याच्या चुलत भावाने काल रात्री एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये गोळीबार केला होता. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना देखील अटक केली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीमधील नडेनगरमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हा गोळीबार नेमका कोणावर करण्यात आला होता यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पण याप्रकरणी वाकड पोलिसांनी माजी नगरसेवक विनोद नढे आणि सचिन नढे यांना अटक केली आहे.

विनोद नढे आणि ज्योतिबा नढे असं गोळीबार करणाऱ्या आरोपीची नाव आहेत. या दोन्ही आरोपींनी काल रात्री पावणे दहाच्या सुमारास काळेवाडी पेट्रोल पंपासमोरील राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गोळीबार केला. हवेत आणि लाकडी टेबलवर या दोन्ही आरोपींनी गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या विनोद नढे आणि सचिन नढे या दोन्ही आरोपींना बार मालकाच्या फिर्यादीवरून वाकडं पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या .

गोळीबार करणारा ज्योतिबा नढे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सांगवी, वाकड आणि पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत. अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक आणि त्याच्या चुलत भावाकडून बारमध्ये गोळीबार झाल्याने काळेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT