- गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड - Saam TV
मुंबई/पुणे

गणेश गायकवाडला मोक्का - पुणे पोलिसांच्या रडारवर अनेक राजकीय व आध्यत्मिक गुरू

विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड सह पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र या मोक्का कारवाई नंतर त्यांचे आध्यत्मिक गुरू व राजकीय संबंध उघड झाले आहेत

सागर आव्हाड,सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यात Pune पैश्याच्या जोरावर गुन्हे करणा-या कॉंग्रेस Congress नेत्यासह आठ जणांना मोक्का MCOCA लावण्यात आला आहे.. खुनाचा प्रयत्न.. अपहरण, दरोडा, खंडणी, पठाणी सावकारी, जागा बळकावणे अशा विविध गंभीर गुन्हे Crime दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड सह पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र या मोक्का कारवाई नंतर त्यांचे आध्यत्मिक गुरू व राजकीय Political संबंध उघड झाले आहेत. Many Religions Guru's on Radar of Pune Police

गणेश गायकवाड टोळीचे बडे राजकीय नेते आणि अध्यात्मिक गुरुंशी असलेले लागेबांधे आता समोर येऊ लागले आहेत. गायकवाड टोळीवर Gang गुन्हा दाखल होण्याच्या अवघे काही दिवस आधी दिंडेरीच्या मोरे गुरुजींनी गायकवाडच्या घरी पाहुणचार घेतला आहे. मोरे गुरुजींचं हेलीकॅाप्टर मधून थाटात झालेलं आगमन आणि गायकवाड यांनी केलेला शाही पाहुणचार पुण्यात चर्चेचा विषय ठरले होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी ही गायकवाड याच्या घरी हजेरी लावली होती. तिथेच त्यांनी गणेश गायकवाडचा पक्ष प्रवेशही करुन घेतला. गायकवाड टोळीच्या अशा संबंधांमुळेच आतापर्यत त्यांच्या विरोधात तक्रार करायला कोणी धजावत नव्हते. गायकवाड वर मोक्का कारवाई नंतर हे सर्व समोर आलंय.

नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात Politics खळबळ माजवली आहे. अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अनेक दृष्कृत्ये तसेच क्रूर कहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत. राजकीय गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुनेचा आतोनात छळ करण्यात आला. पुणे पोलिसांकडे गायकवाड विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत गणेश गाईकवडचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आला आहे असं पोलीस आयुक्त सांगतात

गायकवाड विरुद्ध गेल्या महिन्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. त्यात अनेक बांधकाम व्यावसायिकाच्या अनेक साईटवर जाऊन गणेश, त्याचे वडील व साथीदारांनी काम बंद पाडले. हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केल्याचा गुन्हा जून महिन्यातच नोंदविण्यात आलेला आहे. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची सूस येथील एक एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली आहे.

तसेच 20 लाख रुपयाच्या मुद्दलाबदल्यात 85 लाख रुपये व्याज्याच्या पैशापायी रायगड येथील 7 एकर जागा आणि पुण्यातील 4 गुंठे जागा गायकवाडने बळजबरीने बळकावली असून पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आमच्या सारखे अेक लोक आहेत त्यांना गायकवाड ने त्रास दिला आहे .दरोडा, खंडणी, गोळीबार, अपहरणासह अवैध सावकारी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून देखील गायकवाड पितापुत्र अद्याप मोकाट फिरत आहेत, असे तक्रारदार महेश काटे व सौरभ बालवडकर यांनी सांगितले

गायकवाड कुटुंबिय व साथीदारांविरुद्ध एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. पिंपरी-चिंचवड सह पुण्यातही चतुशृंगी पोलिस ठाणे अनेक गुन्हे दाखल होऊनही गणेश व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश असल्याचे दिसून येत आहे. चतुःशृंगींच्या सदर दोन गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल तिन्ही गुन्ह्यातही गायकवाडांना दीड महिन्यानंतरही अटक झालेली नाही.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT