Pune Golibar Eidgah Ground Traffic Diversion  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; पर्याय मार्ग कोणते?

Pune Traffic News : ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ईदगाह मैदानात नमाज पठणामुळे अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar
  • ईदनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल

  • लष्कर भागातील काही रस्ते पूर्णपणे बंद

  • सकाळी 6 ते 11:30 दरम्यान ट्रॅफिक डायव्हर्जन

  • वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा सल्ला

सचिन जाधव, पुणे

Pune Golibar Eidgah Ground Traffic Diversion पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज सर्वत्र ईद साजरी केली जात आहे. अशातच पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रमजान ईदनिमित्त आज लष्कर भागातील ईदगाह मैदान येथे सामुहिक नमाज पठण करण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे. गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.

गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारी जड वाहने ही पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी, लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जातील. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेट किंवा शहरात येणाऱ्या वाहनांनी भैरोबा नाल चौकातून एम्प्रेस गार्डन, घोरपडीमार्गे इच्छितस्थळी जावे.

लष्क भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. सीडीओ चौकातून गोळीबार मैदानकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल या रस्त्याचा वापर करावा.खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे.

स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्ग सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने सोलापूर रस्त्याकडे जावे. खटाव बंगला चौकातून लुल्लानगरमार्गे वाहने सोलापूर रस्त्याकडे जातील. सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'तलावांचा भंडारा जिल्हा' कोरडा ठाक!

बीडमध्ये अतिक्रमणची निर्दयी कारवाई! गरीब आजीची भाजी कचऱ्यात, डोळ्यातून अश्रूंचा पूर

Weather Update : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

महिलांनो सावधान! शरीरात 'हे' ५ बदल दिसल्यास असू शकतो मधुमेह; चुकूनही करू नका दुर्लक्ष

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची यशस्वी घोडदौड; २२व्या दिवशीही छप्परफाड कमाई, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

SCROLL FOR NEXT