PMRDA action on illegal plotting in Purandar pune : पुण्यातील पुरंदरमध्ये विमानतळ होणार, हे निश्चित झालेय. विमानतळ होणाऱ्या त्याच पुरंदरमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कारण, या ठिकाणी बेकायदा प्लॉटिंग केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे PMRD कडून यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील १५ गावांत सर्वेक्षण सुरू आहे.
पुरंदर परिसरात जमिनीला भाव चांगला येणार असल्यामुळे अनेक एजंटकडून जमिनी विकण्याचा घाट सुरू करण्यात आला आहे. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काही जणांकडून विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री, प्लॉटिंग केली जात आहे. बेकायदेशीर प्रकारावर आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून १५ गावात सर्वेक्षण झाले आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास PMRD कडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे विमानतळ होणार आहे आणि या निमित्ताने स्वाभाविकपणे तिथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये जागा खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत काही दलाल आणि विकासकांनी विनापरवाना प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. अनेक एजंटकडून जमीन विकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी बनावट कागदपत्र बनवून खरेदी खत तयार करत पैसे लुबाडण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीर प्रकारावर आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) धडक कारवाई सुरू केली आहे.
पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील १५ गावांत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते आहे. आंबोडी, चिव्हेवाडी, देवडी, दिवे, गुऱ्होली, जाधववाडी, काळेवाडी, केतकावळे, कुंभारवळण, पवारवाडी, सिंगापूर, सोनोरी, उदाचीवाडी, वनपुरी आणि झेंडेवाडी अशा गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत बांधकामे, रस्ते, सीमारेषा व विक्रीसाठी तयार केलेले प्लॉट यांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमबाह्य प्लॉटिंग आढळेल, त्या ठिकाणांवर पीएमआरडीएकडून नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात बांधकाम परवानग्या, नोंदणी आणि कायदेशीर कारवाईच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असाही इशारा पीएमआरडीएने दिला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.