pune news saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

pune double decker twin : पुण्यात 'डबल डेकर ट्विन टनल' उभारण्यात येणार आहे. येरवडा ते कात्रजदरम्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

Vishal Gangurde

पुण्यात उभारला जाणार 'डबल डेकर ट्विन टनल'

प्रकल्पातील भूमिगत रस्त्याच्या आराखडा अंतिम टप्प्यात

प्रकल्पामुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल' उभारला जाणार आहे. यासाठी पुण्यातील कात्रज ते येरवज्यादरम्यान भूमिगत रस्त्याच्या आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जमिनीवरील दुहेरी उड्डाणपुलाप्रमाणे भूगर्भात दोन स्तरांचा भूमिगत मार्ग निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुण्यातील येरवडा-कात्रजसह एकूण ५४ किलोमीटरच्या भुयारी रस्त्यांसाठी ३६ हजारांहून अधिक कोटींच्या खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील या प्रकल्पासाठी सुमारे ५४ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. भुयारी मार्गांत आपत्कालीन परिस्थिती बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्यात आलाय.

'मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सीने आराखडा तयार केला आहे. वाहतुकीची सद्यस्थिती, भविष्यातील वाहतूक वाढ, बोगद्याचे पर्याय, आर्थिक व्यवहार्यता आणि निधी या विषयी चर्चा आराखड्यात करण्यात आली आहे. यातील सर्व माहिती राज्य सरकारकडे सादर करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी एसपीव्ही स्थापना करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या सल्लागार संस्थेने अभ्यासासाठी ४५ ठिकाणी २४ तास वाहनांची मोजणी, वळण घेणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवास चालू आणि प्रवास बंद होणाऱ्या ठिकाणांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यावर आधारित 'ट्रॅफिक मॉडेलिंग' करण्यात आलं आहे.

वैभव टॉकिज-हडपसर, हॅरिस ब्रिज, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्ता, खराडी बायपास यांसारख्या ठिकाणी वाहतुकीचा ताण असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले. यात सात संभाव्य बोगद्यांचाही विचार करण्यात आलाय. जगताप डेअरी-सिंहगड रस्ता , येरवडा हिंजवडी मार्ग देखील प्रस्तावित असल्याचे समोर आलं आहे.

बोगद्यांमुळे रस्त्यावरील वाहतुकीत जवळपास १५ ते २२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. नव्या प्रकल्पामुळे येरवडा ते हिंजवडी हा ७५ मिनिटांचा प्रवास आता १६ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. जगताप डेअरी ते कोथरुड हा प्रवास ६५ मिनिटांवरून अवघ्या ७ मिनिटांवर येईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT