Heavy traffic on Pune roads as administration considers banning vehicles older than 15 years to curb rising air pollution. saam tv
मुंबई/पुणे

Pune Pollution: पुण्यात जुन्या वाहनांना प्रवेश बंदी? राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव, काय आहे कारण?

Pune Pollution : पुण्यातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास सात लाखांहून अधिक वाहननांवर बंदी घातली जाऊ शकते.

Bharat Jadhav

  • पुण्यात १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर बंदीचा प्रस्ताव.

  • वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये.

  • सुमारे ७ लाख वाहनांवर निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता.

सचिन जाधव , साम प्रतिनिधी

पुणे शहरातील वायू प्रदूषण वाढले आहे. शहरात आणि औद्योगिक परिसरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसन विकार, घशाचे संसर्ग आणि ऍलर्जीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेत. हवा विषारी झाल्यानंतर आता प्रशासन यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आले असून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना आखत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना बंदी केली जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविणार आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यास सुमारे सात लाखांहून अधिक वाहनांना पुण्यात धावता येणार नाही.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुण्यात सहा लाख ८३ हजार ४११ खासगी संवर्गातील, तर ४६ हजार २८४ परिवहन संवर्गातील वाहनांचे आयुर्मान १५ वर्षांहून अधिक आहे. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. दुचाकींची संख्या पाच लाख १२ हजार ५७५ आहे. दरम्यान ही सात लाख वाहने रस्त्यावर न आल्यास सुमारे ८० ते ९० टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. विषारी घटक व नायट्रोजन ऑक्साइड्सचे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी होईल. यासह शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार आहे. वाढत चाललेल्या वायू प्रदूषणामुळे श्वसन विकार, घशाचे संसर्ग आणि ऍलर्जीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांमध्ये याचा अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दर तासाला तब्बल 6 टन सिमेंटचं विष मिसळलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दरवर्षी तब्बल 50 हजार टन सिमेंटचे विष कालवले जाते. पुणे आणि पिंपरीत एकूण 502 अधिकृत प्लान्ट्स आहेत. त्यातील 372 प्लान्ट्स पुण्यात तर सुमारे 130 प्लान्ट्स पिंपरी- चिंचवड शहरात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika-Vijay Net Worth : रश्मिका-विजयचा उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न सोहळा संपन्न; कोट्यवधींचा खर्च, 'विरोश'ची एकूण संपत्ती किती?

अजितदादांना खराब विमान का दिलं? पवारांचा डीजीसीएला सवाल

संकट अंगावर झेलणारा सह्याद्री आता आपल्यात नाही; राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू

Butterfly Mangalsutra Design: साडी-ड्रेस दोन्हीवर खुलून दिसाल, पाहा ७ ट्रेंडी आणि स्टायलिश बटरफ्लाय मंगळसूत्र डिझाईन्स

Maharashtra Live News Update: अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गडचिरोली जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

SCROLL FOR NEXT