pune builders x
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात २०० कोटी रुपयांचा घोटाळा, नामांकित बिल्डर्सवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर २०० कोटींपेक्षा जास्तची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये नामांकित बिल्डर्सवर २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणुकीचा गुन्हा दाखल.

  • १९ आरोपींविरुद्ध जमिनीच्या गैरव्यवहार आणि बळकावण्याच्या कटकारस्थानासाठी गुन्हा नोंदवला.

  • गुन्हा राहुल राजीव अरोरा यांच्या तक्रारीवर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये दाखल, रियल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी धक्का.

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर जवळपास २०० कोटी रुपयांपेक्षा जास्तची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाने लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमधील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एलिफंटा रियालिटी रामा ग्रुपचे मोची उधाराम पंजाबी, राजू राम पंजाबी, जितेंद्र सूरदास पंजाबी, नरेश रामचंद्र पंजाबी आणि वर्धामान ग्रुपचे प्रकाश भिकाचंद्र छाजेड यांच्या विरोधात आणि त्यांच्यासोबत जमीन बळकावण्याच्या कटकारस्थानात सहभागी असलेले आणि जमिनींचा ताबा घेण्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीचे गैरव्यवहार, जमीन बळकावण्यासाठी कटकारस्थान करणे आणि जमिनींचा ताबा घेण्यात सहभागी असणाऱ्यांमध्ये नामांकित बांधकाम व्यवसायिकांसह एकूण १९ जणांचा समावेश आहे. यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२), १११ आणि ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय वंशाचे तसेच अमेरिकेचे नागरिक असलेले राहुल राजीव अरोरा यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये एलिफंटा रियालिटी रामा ग्रुप बिल्डर आणि वर्धमान बिल्डर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बांधकाम व्यावसायिकांवर जमिनीच्या व्यवहारातून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने अनेक फ्लॅट आणि शॉप विकत घेणाऱ्यांना तसेच रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT