Pune : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात टोळीयुद्धाचा भडका! SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात टोळीयुद्धाचा भडका!

मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील गुंडानी विठ्ठल शेलारवर हल्ला केल्याचा CCTV व्हिडीओ व्हायरल होतोय.

गोपाल मोटघरे

पुणे :  पुण्यातील (Pune) गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) आणि विठ्ठल शेलार (Vitthal Shelar) यांच्यात पुन्हा एकदा व्यावसाईक वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका उडालाय. मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्याच हल्ल्याची ही CCTV दृश्य आहेत.

ही घटना मागिल महिन्यात हिंजवडी (Hinjewadi) परिसरात घडली होती. मात्र,दोन्ही गुंडांची (Goons) दहशत एवढी आहे की त्या  बाबत एकही नागरिक तक्रार द्यायला पुढे आला नाही शेवटी पोलिसांनी स्वतःच पुरावे गोळा केले आणि शरद मोहळ आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मागील काही महिन्यापासून शेलार आणि  मोहोळ टोळीचे गुंड सदस्य सक्रिय झाल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली होती.  मात्र, आता हे गुन्हे दाखल झाल्या नंतर मोहोळ टोळीच्या कारवाया मंदावल्या आहेत. तर, शेलार टोळीतील सदस्यही पसार झाले असल्याची माहिती समोर येतेय.

कोण आहे शरद मोहोळ?

पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख 

शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचे अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

मोहोळ व आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते.

त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता.

या खटल्यातून त्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

कोण आहे विठ्ठल शेलार?

विठ्ठल शेलार मुळशी तालुक्यातील कुख्यात गुंड 

शेलार विरुद्ध खून, अपहरण, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार MCOCA (मोक्का) कारवाई करण्यात आली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT