Tragic Accident in Pune Saam
मुंबई/पुणे

पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून तरूणीचा मृत्यू

Tragic Accident in Pune: आयटी पार्क हिंजवडी परिसरामध्ये आज दुपारी डंपर ट्रक चालकाने पुन्हा एका तरुणीचा बळी घेतला आहे. पुनावडे रोड वरील लाइफ रिपब्लिक सोसायटी समोर अपघात घडला.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील हिंजवडी पार्क परिसरात भीषण अपघात

  • ट्रकची दुचाकीला धडक

  • निष्पाप तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील आयटी पार्क हिंजवडीतून अपघाताची घटना उघडकीस आली आहे. डंपर ट्रक चालकाने एका तरूणीला चाकाखाली चिरडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. वडील दुचाकीच्या मागे बसले होते. मात्र ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. तसेच तरूणी चाकाखाली आली.

प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात आयटी पार्क हिंजवडी परिसरात घडला. तरूणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. तरूणी दुचाकी चालवत होती. पुनावडे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटी समोरून जात असताना भरधाव डंपर ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरूणी आणि वडील रस्त्यावर पडले.

तरूणी थेट डंपरच्या खाली गेली. तसेच चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय वर्ष २०) या निष्पाप तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रक चालकाला पकडून हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

तसेच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र आयटी पार्क हिंजवडी मान आणि मारुंजी परिसरात डंपर ट्रकच्या चाकाखाली निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नियमबाह्य वेळेत तसेच बेदरकारपणे चालणाऱ्या डंपर ट्रक चालकांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मगरपट्टा कालवा फुटी प्रकरण, दुरुस्तीसाठी लागणार चार ते पाच दिवस

IAS Sanjiv Hans Bribe : IAS संजीव हंस अडचणीत; बिल्डरकडून १ कोटींची लाच घेतल्याचा आरोप, काय आहे संपूर्ण प्रकरण?

विद्यार्थिनीलाही सोडले नाही, भोंदू अशोक खरात पुरता अडकला; पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

Hidden Fort In Maharashtra : भंडाऱ्यातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावर करा भटकंतीचा प्लान

Dhurandhar 3 : आता 'धुरंधर 3' थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार; रणवीर सिंहच्या सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT