Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune : MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीचा अभ्यासिकेत मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी येथे घडली.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी येथे घडली. विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी (Pune) येथे घडली. ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (Pune Crime News Today)

पूजा वसंत राठोड (वय २५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. ती एका कंपनीत नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होती. आपल्या बहिणीसोबत ती पुण्यात राहत होती. (Latest Marathi News)

मंगळवारी पुजा स्टडी सेंटरच्या अभ्यासिकेत अभ्यास करीत बसली होती. अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती जागेवरच कोसळली. यानंतर काही विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात जाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (Maharashtra News)

पुजाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. काल पुजा राठोड हिच्यावर तिचं मूळ गाव कोंडी तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : डासांना पळवून लावण्यासाठी लिबांच्या सालीचा भन्नाट उपाय, एकदा नक्की करून पाहा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Housing Society : घरमालकांसाठी महत्त्वाचा नियम! फ्लॅट भाड्यानं देताना केली १ चूक, पुण्यात १३० जण अडचणीत; कायदा काय सांगतो? वाचा

Chanakya Niti : नातेवाईकांना 'या' 7 गोष्टी सांगाल तर रस्त्यावर याल! चाणक्यांचा गंभीर इशारा

कल्याणमध्ये १८४ रहिवाशांची १७६ कोटींची फसवणूक? बड्या बिल्डरविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT